नाना पटोले नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार, नितीन गडकरींविरोधात रिंगणात?


भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभा लढवणार आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची पहिली उमेदवारांची यादी रात्री उशिरा जाहीर केली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी काँग्रेसची छाननी समितीची बैठक दिल्लीत झाली. यावेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभा लढवण्यास काँग्रेस छाननी समितीसमोर होकार दिला आहे. त्यामुळे नागपुरात भाजपचे विद्यमान खासदार आणि मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले हे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, भाजपकडून गडकरींची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही.

नाना पटोले यांनी नागपूरमधून निवडणूक लढविणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणालेत, छाननी समितीकडून आज मला नागपूर संदर्भात विचारणा करण्यात आली. नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढण्यास मी होकार दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलणे झाले आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागपुरात भाजप विरोधात काँग्रेस अशी थेट निवडणूक लढत होणार आहे. नितीन गडकरी यांच्या विरोधात लढणार नाना पटोले हे लढणार असल्याने प्रचंड उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत राज्यातील काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यात आलेत. थोड्याच दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. काल काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.

हे असणार काँग्रेसचे उमेदवार?

– सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, रामटेकमधून मुकुल वासनिक, 
– यवतमाळमधून  माणिकराव ठाकरे, 
– नांदेडमधून अमिता चव्हाण, 
दक्षिण मुंबईतून  मिलिंद देवरा यांची नावं निश्चित, तर नागपूरमधून नाना पटोले यांच्या नावाची चर्चा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*