मलायका-अरबाज नृत्य रियालिटी शोचे परीक्षक म्हणून येणार एकत्र?


अरबाज आणि मलायका हे दोघे पून्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधान येत आहे.  

मुंबई :  अभिनेत्री मलायका आरोरा आणि अरबाज खान दोघे  विभक्त झाले आहेत. ते दोघे त्यांचे आयुष्य त्यांच्या मर्जीने जगत आहेत. अरबाज खान सध्या मॉडेल जॉर्जियाला डेट करत आहे तर दुसरीकडे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत. अरबाज आणि मलायका घटस्फोटानंतरही एकमेकांचे  चांगले मित्र आहेत. मलायका नेहमी खान कुटुंबीयांच्या कार्यक्रमात उपस्थित असते. हे दोघे पून्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधान येत आहे. तर हे दोघे एका नृत्य रियालिटी शोचे  परीक्षक म्हणून एकत्र येणार आहेत.  

आमची वृत्तसंस्था डीएनएने दिलेल्या वृत्तानूसार नृत्य रियलिटी शोच्या निर्मात्यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. शो चे परिक्षक हे विभक्त कपल असायला हवे म्हणून मलायका आणि अरबाज यांची निवड करण्यात आली. मलायका-अरबाज यांनी १८ वर्षांच्या सुखी संसारा नंतर एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तर अरबाजने शोचे परीक्षण करण्यास होकार दिला आहे. पण मलायक कडून आतापर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. निर्मात्याच्या मते या शोच्या माध्यमातून विभक्त जोडपे एकत्र आले तर ती गोष्ट नृत्य रियलिटी शोसाठी एक मोठं यश असेल. 

एका कार्यक्रमात बोलत असताना मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या नात्याला कबुली दिली. अर्जुन कपूर सध्या त्याच्या ‘संदीप और पिंकी फरार’,‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ आणि ‘पानीपत’ सिनेमांच्या शूटिंग मध्ये व्यग्र आहे. ‘पानीपत’ सिनेमामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा ६ डिसेंबर रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. तर दुसरी कडे मलायका तिच्या फॅशन शोमध्ये व्यग्र आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*