श्रीदेवींची रील लाईफ आणि रिअल लाईफ मुलगी झळकणार एकत्र


श्रीदेवींची रील लाईफ मुलगी आणि रियल लाईफ मुलगी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. जान्हवी कपूरच्या बहुप्रतिक्षीत सिनेमात रिवा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मुंबई : बॉलिवूडची ‘चांदनी’ म्हणजेच श्रीदेवींवर चित्रित करण्यात आलेल्या ‘मॉम’ सिनेमात रिवा अरोरा त्यांच्या लहान मुलीच्या भूमिकेत झळकली होती. ‘मॉम’ हा सिनेमा श्रीदेंवींचा शेवटचा सिनेमा होता. आता श्रीदेवींची रील लाईफ मुलगी आणि रिअल लाईफ मुलगी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. जान्हवी कपूरच्या बहुप्रतिक्षीत सिनेमात रिवा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जाह्नवी सध्या इंडियन एयरफोर्सच्या वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये व्यग्र आहे. गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये रिवा बाल कलाकाराच्या भूमिकेत  दिसणार आहे.

२०१८ साली आलेल्या ‘धडक’ सिनमाच्या माध्यमातून अभिनेत्री जाह्नवी कपूर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. इंडियन एयरफोर्सच्या वैमानिक गुंजन सक्सेना यांची यशोगाथा जाह्नवी कपूर प्रेक्षकांपुढे मांडणार आहे. या सिनेमासाठी जान्हवी कपूर विशेष मेहनत घेत आहे. सिनेमाच्या शूटिंगचे काम अंतीम टप्प्यात आहे. त्यानंतर ती दिग्दर्शक करण जोहरच्या मल्टीस्टारर ‘तख्त’ सिनेमात झळकणार आहे. 

कोण आहेत गुंजन सक्सेना

गुंजन सक्सेना ह्या पहिल्या भारतीय आयएएफ वैमानिक आहेत. 1999 साली झालेल्या कारगील युद्धामध्ये त्यांचे योगदान फार मोलाचे आहे. युद्ध क्षेत्रात जाऊन त्यांनी जखमी सैनिकांना बाहेर काढले. कोणतेही शस्त्र जवळ नसताना त्यांनी शत्रूंसोबत दोन हात केले. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना शैर्य चक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. गुंजन यांनी दिल्लीतील हंसराज महाविद्यालयातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना आयएएफ मध्ये महिलांच्या पहिल्या वर्गात शिकण्याची संधी मिळाली. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*